esakal | अर्थसंकल्पातील शैक्षणिक तरतुदीवर उदय सामंत म्हणाले,
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Uday Samant Comment On Budget 2020

दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित डिजिटायझेशन करण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास रूपये 5 कोटीचे विशेष अनुदान देण्यात आले आहे. तसचे एशियाटिक सोसायटीलाही विशेष अनुदान देण्यात येणार आहे. बाबींकरिता 1 हजार 300 कोटी नियतव्यय प्रस्तावित केला आहे.

अर्थसंकल्पातील शैक्षणिक तरतुदीवर उदय सामंत म्हणाले,

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - विद्यार्थांचा भविष्यवेध घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय रत्नागिरी, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रत्नागिरीसह राज्यातील 12 शासकीय संस्थांमध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अर्थसंकल्पावर दिली. 

मुंबई आणि पुणे विद्यापीठात मागासवर्गीय मुला - मुलींसाठी 500 निवासी क्षमतेची वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, तसेच शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय रत्नागिरी, कऱ्हाड, औरंगाबाद आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय रत्नागिरी, पुणे, नागपूर येथील शासकीय संस्थांमध्ये 12 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेस 125 वर्षे पूर्ण झाली आहेत.

दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित डिजिटायझेशन करण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास रूपये 5 कोटीचे विशेष अनुदान देण्यात आले आहे. तसचे एशियाटिक सोसायटीलाही विशेष अनुदान देण्यात येणार आहे. बाबींकरिता 1 हजार 300 कोटी नियतव्यय प्रस्तावित केला आहे. पर्यटन व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता महाविद्यालयांमध्ये पर्यटन व हॉस्पिटॅलिटी पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सन 2020-21 या अर्थिक वर्षात 11 कोटी अनुदान देण्यात येणार आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. 

उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1300 कोटी 

उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1300 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास नक्कीच फायदा होईल. कोकणच्या विकासाला प्राधान्य देऊन कोकणच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, असेही सामंत यांनी सांगितले. 

loading image