बेपर्वांंची गय करू नका - मंत्री उदय सामंत

Minister Uday Samant Meeting dodamarg konkan sindhudurg
Minister Uday Samant Meeting dodamarg konkan sindhudurg
Updated on

दोडामार्ग (सिंधदुर्ग) - कोरोना प्रतिबंधासाठी सिंधुदुर्गातील 99 टक्के लोक सहकार्य करत आहेत; मात्र 1 टक्के लोक बेपर्वा वागून 99 टक्के लोकांचे आयुष्य पणाला लावत आहेत. त्यांची गय करू नका. त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश  पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांना दिले. 

येथील तहसील कार्यालयात त्यांनी आज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेतली. या वेळी तहसीलदार मोरेश्‍वर हाडके, तालुका आरोग्य अधिकारी रमेश कर्तसकर, वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्‍वर ऐवळे, पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, सभापती संजना कोरगावकर, नगराध्यक्ष लिना कुबल, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई व नागेंद्र परब, सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, युवासेना उपतालुकाप्रमुख भगवान गवस, गोपाळ गवस, संतोष मोर्ये, चंदन गावकर, संजय गवस, प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, ""सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाण्याच्या टप्प्यात आहे; पण ज्यांना केवळ त्रास देण्यात आनंद वाटतो अशी काही माणसे लॉकडाउन आणि शासनाने दिलेल्या सूचनांची पायमल्ली जाणूनबुजून करत आहेत.

जिल्ह्यातील 99 टक्के माणसे घरात बसून नियम पाळत शासनाला सहकार्य करत आहेत; पण एक टक्के माणसे जिल्ह्याला धोक्‍याच्या खाईत ढकलत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. त्या एक टक्के लोकांनी केलेल्या चुकीची शिक्षा रत्नागिरी जिल्हा भोगत आहे. तशी वेळ सिंधुदुर्गवर येऊ द्यायची नसेल तर त्या एक टक्के लोकांची गय करून चालणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करा.'' 
दरम्यान, ज्या 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत त्या 3 मेपर्यंत सोडायच्या नाहीत असे आदेशही श्री. सामंत यांनी पोलिसांना दिले. 

हत्तींबाबत कर्नाटकशी चर्चा 
कोरोना आणि केएफडीप्रमाणेच हत्तीचे संकटही गंभीर आहे. हत्तींच्या बंदोबस्तासंदर्भात काय उपाययोजना केल्यात याची जिल्ह्याच्या उपवनसंरक्षकांकडून माहिती घेईन आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलेन, अशी ग्वाही हत्तीबाधित शेतकऱ्यांना दिली. 

...तर ठेकेदारावर कारवाई 
तालुक्‍यातील 1900 शिधापत्रिका धारकांना दोन दिवसांत धान्य देण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार हाडके यांना दिल्या. मजुरांचे सर्वेक्षण सुरू आहे. ठेकेदाराने जाणीवपूर्वक मजुरांना वाऱ्यावर सोडले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल; पण लॉकडाउन काळात कुणीही उपाशी राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ, असेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com