कोरोना जाण्यासाठी मंत्र्यांचे ट्विटरवरून साकडे 

राजेश कळंबटे
रविवार, 12 जुलै 2020

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून हे गाऱ्हाणे घातलं आहे.

रत्नागिरी : राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने जगातून करोना कायमचा जावा म्हणून चक्क गाऱ्हाणे घातलं आहे. ट्विटरवर तशी पोस्टच त्यांनी टाकली आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून हे गाऱ्हाणे घातलं आहे. मंत्री सामंत यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'बा देवा महाराजा... व्हाय महाराजा... ह्यो जो काय करोनाचो राक्षस जगात, देशात आणि माझ्या महाराष्ट्रात थैमान घालता हा त्येचो कायमचो काय तो बंदोबस्त कर रे महाराजा... पॉझिटिव्ह इले त्येंका निगेटिव्ह कर, निगेटिव्ह इले त्येंका सुखरूप ठेव रे महाराजा... माझ्या पोरांच्या परिक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा... चाकरमान्यांका गणपतीचं दर्शन होऊ दि रे महाराजा... ह्योच्यात जर कोणी आडो इलो तर त्येका उभो कर, उभो इलो तर त्येका आडो कर रे महाराजा... एकाचे एकवीस कर... पाचाचे पंचवीस कर...पण माझ्या भारताक, महाराष्ट्राक लवकरात लवकर करोना मुक्त कर महाराजा... व्हय महाराजा...,' असं गाऱ्हाणंच सामंत यांनी ईश्वराला घातले आहे.

 

 

 

हे पण वाचा -  आता क्वारंटाईनसाठी असणार नवे नियम

 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister uday samant post on twitter of corona virus