मंडणगड नगरपंचायतीत सध्या काठावरचे बहुमत आहे. महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत असला तरीही विकासकामांचे प्रश्न व निधीच्या असमान वितरणावर नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.
मंडणगड : विकासाच्या वाटेवर नगरपंचायत अग्रेसर होण्यासाठी परिवर्तन करत लवकरच मंडणगड नगरपंचायतीवरही (Mandangad Nagar Panchayat) शिवसेनेचा भगवा फडकवू, असे गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी मंडणगड येथील कार्यक्रमात देत दापोलीप्रमाणेच परिवर्तन घडवून आणणार असल्याचे सुतोवच केले आहे. तसेच येथील नगरसेवकांच्या निकटवर्तीयांनीच उबाठाला जय महाराष्ट्र करीत धनुष्यबाण हाती घेतल्यामुळे मंडणगडमध्येही मिशन टायगरचे संकेत मिळू लागले आहेत.