esakal | पॉझिटिव्ह म्हणून भितीने पळाला पण निगेटिव्ह निघाला
sakal

बोलून बातमी शोधा

by mistake of hospital one man report of corona positive but he is a negative report in ratnagiri

तालुका प्रशासनाने तातडीने भू येथील तीन वाड्या कंटेन्मेंट झोन घोषित करून पुढील कार्यवाही सुरू केली.

पॉझिटिव्ह म्हणून भितीने पळाला पण निगेटिव्ह निघाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : कोरोना विषाणूचा दिवसागणिक फैलाव वाढत असताना कोरोनाचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धसका घेऊन रुग्णालयातून पळालेल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला. हा प्रकार शनिवारी (३) जिल्हा रुग्णालयामध्ये घडला. जिल्हा रुग्णालयाच्या अशा कारभाराबाबत लोकांमधून तीव्र आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

तालुक्‍यातील भू येथील रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. तालुक्‍यातील भू येथील दीपक कुंभार यांना गेल्या बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असे सांगण्यात आले. तालुका प्रशासनाने तातडीने भू येथील तीन वाड्या कंटेन्मेंट झोन घोषित करून पुढील कार्यवाही सुरू केली. भू येथील व्यापाऱ्यांनीही खबरदारी म्हणून तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने घेतला. 

हेही वाचा - निर्यातीच्या मासळीला दहा वर्षांपूर्वीचाच दर ; दलालांसोबत संघर्ष पेटणार

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून हा रुग्ण पळाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर उडालेल्या गोंधळामध्ये दीपक कुंभार याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगत जिल्हा रुग्णालयाकडून चूक झाल्याची कबुली देण्यात आली. मात्र, बेपत्ता दीपक कुंभार याची शनिवारी (३) रात्री उशिरापर्यंत शोधाशोध सुरू होती. शोध सुरू असताना कुंभार रत्नागिरीतच सापडले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले आहे.

संतप्त ग्रामस्थांनी सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून धारेवर धरले. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र अधिकारी निरूत्तर झाले होते. सभेला माजी सभापती अभिजित तेली, सरपंच वसंत तांबे, संजय सरफरे, डॉ. भाटये, रोहीत देव आदी उपस्थित होते.

हेही वाचा -  कोकणातील प्रकल्प लातूरला हलविण्याच्या मागणीमुळे अमित देशमुखांवर विनायक राऊत चिडले

"आम्हाला जिल्हा रुग्णालयातून दीपक कुंभार यांचे नाव अँटिजेन टेस्टच्या पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांची अँटिजेन टेस्ट झालीच नाही. त्यांची आरटीपीसीआर टेस्ट झाली त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. जिल्हा रुग्णालयात नजरचुकीने कुंभार यांचे नाव अँटिजेन पॉझिटिव्हच्या लिस्टमध्ये दाखल झाले." 

- शैलश रेवाळे, पर्यवेक्षक, सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top