कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक व माझे एका आरोपीसोबत असलेले फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. ते बीडमधील संतोष देशमुखांसारखे प्रकरण दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती. जिल्ह्याचे नाव कसे खराब होईल, या प्रयत्नात त्यांनी नेहमी बाजी मारलेली आहे, असा आरोप आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला.