राजापूर येथे बुधवारी (ता. १२) रात्री धोपेश्वर देवस्थानची होळी (Dhopeshwar Temple Holi) घेऊन येत असताना होळीच्या मार्गावर दोन गटांत वाद निर्माण झाला होता.
रत्नागिरी : कोकणात सगळेच सण, उत्सव शांततेत साजरे होतात. राजापुरातील स्थितीसुद्धा आटोक्यात आली आहे. आम्ही असेपर्यंत कोकण पेटवू देणार नाही, असे सांगत काही स्वयंघोषित सोशल मीडिया चालवणाऱ्यांनी वातावरण बिघडवू नये. काही घडले तर दोन गटांमध्ये मी उभा राहीन, असे स्पष्ट मत आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी व्यक्त केले.