असा गुन्हा पुन्हा न करण्याचा अटीवर राणे यांना जामीन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

ओरोस -  चिखलफेक प्रकरणात अटक असलेले आमदार नितेश राणे यांना आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन दिला. तसेच या प्रकरणातील अठरा जणांनाही जामीन मंजूर झाला आहे. पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा न करण्याच्या न करण्याची अट यावेळी घालण्यात आली आहे.

ओरोस -  चिखलफेक प्रकरणात अटक असलेले आमदार नितेश राणे यांना आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन दिला. तसेच या प्रकरणातील अठरा जणांनाही जामीन मंजूर झाला आहे. पुन्हा भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा न करण्याच्या न करण्याची अट यावेळी घालण्यात आली आहे.

दरम्यान राणे यांना काल 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर आज ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये राणे यांच्यासह अटकेत असलेल्या सर्व आरोपींना जामीन देण्यात आला आहे. 

दरम्यान जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. दर रविवारी कणकवली पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी तसेच अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये अशा त्या अटी आहेत. प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर देण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांची सुटका झाल्याने सर्वत्र जल्लोष होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane gets bail