
आमदार नितेश राणे यांनी आमदार राजन साळवी यांना भाजपत येण्याची ऑफर दिली आहे.
रत्नागिरी स्थानिकांनी मागणी केल्यास नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील असे मत मांडणारे आमदार राजन साळवी याना भाजपमध्ये येण्याचे आवताणच आमदार नितेश राणे यांनी दिले.
ते म्हणाले,राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतल्यामुळे जर त्यांना शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे.
आमदार राजन साळवी यांनी एका वृत्तवाहिनीशी सूचक वक्तव्य केले होते.यामुळे राज्यातील आणि कोकणातील वातावरण पुन्हा एकदा रिफायनरी प्रश्नावरून ढवळून निघाले. यावर खासदाकर विनायक राऊत यांनी साळवी यांचे ते व्यक्तिगत मत असल्याचे सांगितले. साळवी यांच्या या विधानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र एवढे महत्वाच्या विषयावर श्रेष्ठींच्या संमत्तीविना साळवी बोलतीलका असा प्रश्न केला जात आहे.
या विषयात बोलताना आमदार नितेश राणे यांनी आमदार राजन साळवी यांना भाजपत येण्याची ऑफर दिली आहे. प्रतिक्रिया देताना आमदार नितेश राणे म्हणाले की, राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतल्यामुळे जर त्यांना शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे.
भाजपमध्ये नाणारचे समर्थक आमदार म्हणून त्यांचे स्वागत होईल. आम्ही लोकांच्या बाजूने आहोत, लोकांच्या मताला किंमत देतो. मी जशी समर्थनार्थ भूमिका घेतली तशी राजन साळवी यांनी घेतली आहे. जर त्यांना या भूमिकेमुळे शिवसेनेत त्रास होत असेल तर भाजपाचे दरवाजे उघडे आहेत.