Mumbai-Goa Highway : टोलनाका तोडफोड प्रकरण भोवलं; मनसेच्या 14 पदाधिकाऱ्यांना अटक

या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Mumbai Goa Highway Ratnagiri Police MNS
Mumbai Goa Highway Ratnagiri Police MNSesakal
Summary

समाज माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडिओतही नासधूस करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घोषणा देत असल्याचेही दिसत होते.

रत्नागिरी : खानू येथील महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीचे कार्यालय काल रात्री अज्ञातांनी फोडले. तसेच हातखंबा येथे कामाच्या ठिकाणी असलेला जेसीबीही फोडला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहेत.

खानू तोडफोडीत दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचा आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेतले आहे. हातखंबा येथील जेसीबी तोडफोड प्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा अटकेची कारवाई सुरू होती.

Mumbai Goa Highway Ratnagiri Police MNS
नीलिमाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला अटक, महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता!

मुंबई- गोवा महामार्गावर हातखंबा ते पाली, लांजा या टप्प्यात चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे खानू येथील कार्यालय गुरुवारी (ता. १७) रात्री काही अज्ञातांनी फोडले. काल दुपारी पाली येथील जेसीबीची यांची तोडफोड केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, मोडतोड प्रकरणी मनसेच्या १४ जणांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पाली पोलिस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार आरवली ते वाकेड या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्‍या हॅन इन्फ्रा सोल्यूशन कंपनीचे खानू येथील कार्यालयाची काल रात्री ११ च्या सुमारास वाहनातून आलेल्या पाच अज्ञातांनी तोडफोड केली.

Mumbai Goa Highway Ratnagiri Police MNS
Kolhapur : मुश्रीफांनी इशारा देताच फडणवीसांची 'सुळकूड योजने'त एन्ट्री; वाद चिघळणार की पाणीप्रश्न सुटणार?

समाज माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडिओतही नासधूस करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घोषणा देत असल्याचेही दिसत होते. शुक्रवारी दुपारी महामार्गावर पाली उभीधोंड येथेजेसीबी मशीनच्या काचा फोडून काहींना पळ काढला. पाली पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन कांबळे, संतोष कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल सुमित चिले यांनी पाहणी केली.

पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी विनित चौधरी, परिविक्षाधीन पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील आदी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान हॅन कंपनीच्या खानू, पाली जोयशीवाडी येथील आरएमसी प्लॅन्टवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Mumbai Goa Highway Ratnagiri Police MNS
Uday Samant Latest News : गुवाहाटीला जावून आल्यानंतर फक्त माझं खातं बदललं, मी बदललो नाही; असं का म्हणाले उद्योगमंत्री?

या प्रकरणी कंपनीचे सुरक्षारक्षक संभाजी सुवारे (रा. खानू, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये १ लाख रुपयांचे नुकसान नमूद केले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्याखाली १४ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अद्वैत सतीश कुलकर्णी, मनसे शहराध्यक्ष (रा. अभ्युदय नगर), अविनाश धोंडू मौंदळकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष (रा. नाचणे रोड रत्नागिरी), रूपेश श्रीकांत चव्हाण (रा. कोकण नगर), राजू शंकर पाचकुडे (रा. नरबे करबुडे).

तसेच विशाल चव्हाण (रा. भोके), अजिंक्य महादेव केसरकर (रा. धवल कॉम्प्लेक्स), कौस्तुभ विश्वनाथ केळकर (रा. कोडगाव साखरपा, देवरूख), सतीश चंद्रकांत खामकर (रा. कुवारबाव), सुशांत काशिनाथ घडशी (रा. काटवाचीवाडी), मनीष विलास पाथरे (रा. काळाचौकी मुंबई), सुनील राजाराम साळवी (रा. नाचणे रोड रत्नागिरी), महेश दत्ताराम घाणेकर (रा. देऊड), महेश गणपत घाणेकट (रा. जाकादेवी), रुपेश मोहन जाधव (रा. कोसुंब, संगमेश्वर, सध्या मारुती मंदिर) आदीचा समावेश आहे.

Mumbai Goa Highway Ratnagiri Police MNS
Belgaum Crime : उप्पीटामध्ये विष घालून पतीच्या खुनाचा प्रयत्न; शेतजमीन हडपण्यासाठी पत्नीचं धक्कादायक कृत्य

हातिवले प्रकरणी दोघांना अटक

राजापूर : हातिवले येथील टोलनाका मोडतोड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उपाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना अटक केली आहे. त्यांना राजापूरच्या दिवाणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com