

Leopard Sightings Increase Across Mokhada for Over a Month
Sakal
मोखाडा : मोखाड्यात गेली महिनाभरापासुन बिबट्याचे वेगवेगळ्या भागात दर्शन घडत आहे. दोन ठिकाणी बिबट्याने नागरिकांवर हल्लाचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी, वनविभागाने खोच ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळपाडा येथे पिंजरा लावला होता. मात्र, सहा दिवसात पिंजऱ्यात बिबट्या गावलाच नाही. अखेर, ग्रामस्थांच्या संमतीनंतर येथुन पिंजरा काढुन, बिबट्याचा वावर आढळेल्या ओसरविरा येथे हलविण्यात आला आहे.