Sakal
कोकण
Palghar News : मोखाड्यात वाघ नदी प्रकल्पाच्या कालव्यात अनधिकृत बांधकाम; मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!
Mokhada Wagh Project : मोखाड्यात वाघ नदी प्रकल्पाच्या कालव्यात विनापरवाना अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर पाटबंधारे विभागाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधितांना ७ दिवसांत बांधकाम जमीनदोस्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
मोखाडा : मोखाडा तालुक्यातील वाघ नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याच्या कालव्यात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार काही जागरूक नागरिकांनी केली आहे. त्याची दखल घेत, लघु पाटबंधारे विभागाचे ऊप अभियंता स्वप्निल पाटील यांनी संबंधित काम करणाऱ्या विरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच सदरचे बांधकाम जमीनदोस्त करण्याची नोटीस संबंधिताना बजावली आहे. मोखाड्यातील वाघ नदीवर वाघ प्रकल्प साकारण्यात आला आहे. या धरणाचे पाणी शेतकर्याना देऊन, बारमाही शेती करता यावी हे ऊद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

