Sindhudurg Monsoon
esakal
मॉन्सून उत्तर कोकणातून माघार घेऊन सिंधुदुर्गात पोहोचला आहे.
यावर्षी २५ मे पासून सलग पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची तीव्रता कमी होताच शेतकरी कापणीस प्रारंभ करतील.
वैभववाडी : साडेचार महिने बरसत असलेल्या मॉन्सूनने (Sindhudurg Monsoon) उत्तर कोकणातून माघार घेतली असून, पुढील एक, दोन दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माघार घेण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होणार असून, शेतकऱ्यांना दोन तीन दिवसांत भात पीक कापणी करता येणार आहे.