‘वसंताचं देणं अन निवडुंग ल्यालाय फुलांचं लेणं’ ; एका जातीच्या झाडावर 90 हून अधिक फुलली फुले...

More than 90 flowers can be seen on the hedge cactus in Ratnagiri
More than 90 flowers can be seen on the hedge cactus in Ratnagiri

रत्नागिरी : वसंत ऋतू म्हटला की सपर्ण असोत की निष्पर्ण, सर्वच झाडे फुलांनी बहरलेली दिसतात. मग निवडुंगासारखे झाडदेखील याला कसा अपवाद असेल..! सध्या हाच रुक्ष, काटेरी निवडुंग दुधाळ, पांढर्‍या फुलांनी बहरून गेलाय. रत्नागिरी शहरात हेज कॅक्टस या निवडुंगाच्या एका जातीच्या झाडावर 90 हून अधिक फुले पाहायला मिळत आहेत. या संदर्भात पर्यावरणप्रेमी नेत्रा पालकर-आपटे यांनी माहिती दिली.


निवडुंग फक्त कुंपणासाठी वापरले जाणारे एक काटेरी झुडूप आहे.  मात्र या रुक्ष, काटेरी झुडुपावर जेव्हा फुले फुलतात, तेव्हा सारेजण आश्‍चर्यचकित होतात. या निवडुंगाच्या वेगवेगळ्या जाती असतात. हेज कॅक्टसची वाढ साधारणपणे 30 फुटांपर्यंत होते. सरळ वाढणारे हे झाड आहे, याला फार फांद्या नसतात, मात्र एखादी फांदी मोडली तर तिथूनच नवी फूट येते आणि ती फांदी वाढायला लागते.

हेज कॅक्टस ; 90 हून अधिक फुले; रात्री फुलतात 
सुईसारखे टोकदार विषारी काटे असतात. कधी कधी हे काटे 5 सेंटीमीटर एवढे मोठे पण असू शकतात. या काट्यांमध्ये गांधील माशा आपली पोळी बांधतात. लांब काट्यांची एक नैसर्गिक सुरक्षा त्यांना मिळत असल्याने, अशा ठिकाणी या माश्या घर बांधत असाव्यात. निवडुंगाची ही फुले ब्रह्मकमळासारखीच दिसतात. शेवटी ब्रह्मकमळ हेही एक प्रकारचे निवडुंगच, फक्त त्याला काटे नसतात. ही फुले रात्री उमलतात आणि सकाळी साधारण 8 नंतर कोमेजतात, असे आपटे यांनी सांगितले.

हेही वाचा-भाजपने राज्याला सोडले वाऱ्यावर : विश्‍वजित कदम -
  
फुलांना मंद सुवास
या फुलांचे परागीभवन हे पतंग करतात, कारण पतंग हे रात्रीच अ‍ॅक्टिव्ह असतात. काही ठिकाणी वटवाघळे पण परागीभवनात मदत करतात. लांब देठ असलेली कळी दिसायला लागली की, 3-4 दिवसांत फुले फुलतात. एकाचवेळी भरपूर कळ्या येतात आणि मग खूप फुले फुलतात. या फुलांना अतिशय मंद असा सुवास असतो. हा नजारा बघायला खूप मजा येते. गेल्या पावसाळ्यात एकाचवेळी 105 व आज 90 पेक्षा जास्त फुले फुलल्याचे आपटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com