दाभोळ खाडीत आणखी सहा चीनी बोटी दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

रत्नागिरी  -  दाभोळ खाडीत चीनच्या आणखीन सहा बोटी दाखल झाल्या आहेत. मासेमारी करणाऱ्या या बोटी दाभोळ येथील शिपयार्ड कंपनीत दुरुस्तीसाठी येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. 

रत्नागिरी  -  दाभोळ खाडीत चीनच्या आणखीन सहा बोटी दाखल होणार आहेत. मासेमारी करणाऱ्या या बोटी दाभोळ येथील शिपयार्ड कंपनीत दुरुस्तीसाठी येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. 

दरम्यान या सर्व बोटी दाभोळ बंदरात दाखल झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. दाभोळ पोलिस, कस्टम, आयबी, सागरी पोलिस दल तसेच तटरक्षक दल या सर्व यंत्रणा मिळून या सर्व बोटींची कागदपत्रे तपासणी करणार आहेत व मगच या 
दाभोळ बंदरात दाखल होतील. 

या परदेशी बोटींनी भारतात येण्यापूर्वी परवानगी घेतली आहे. सध्या या बोटी समुद्रात 10 नौटी मैल अंतराच्या आत प्रतीक्षेत उभ्या आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than six Chinese boats enters in Dabhol Khadi