देवगड : विवाहितेने दोन चिमुरड्यांसह खाडीत उडी घेत जीवनयात्रा संपवली. तिघांचेही मृतदेह खाडीपात्रात सापडले. कौटुंबिक वादातून (Family Dispute) तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा (Devgad Police) अंदाज आहे. सौ. श्रीशा सूरज भाबल (रा. तिर्लोट-आंबेरी वय २४) हिच्यासह श्रेयस (वय ६) आणि दुर्वेश (वय ४) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. ही हृदयद्रावक घटना तिर्लोट-आंबेरी पुलाजवळ बुधवारी (ता.१६) उशिरा उघड झाली.