esakal | सुनेच्या मारहाणीनंतर सासूचा अंत; सून अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

सुनेच्या मारहाणीनंतर सासूचा अंत; सून अटकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : सासू सुनेचे जोरदार भांडण जुंपले आणि रागाच्या भरात सुनेने सासूला काठीने मारहाण करून ढकलल्याने तोल जाऊन सासू टेबलावर पडली. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन सासूचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील ताम्हणमळा येथे शनिवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. सून मानसी महेंद्र जडयाळ (२८) हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले असता, तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. वनिता रामजी जडयाळ (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. (mother-in-law-died-crime-news-chiplun-kokan-news)

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

तालुक्यातील ताम्हणमळा पाथरवाडी येथील वनिता जडयाळ व मानसी महेंद्र जडयाळ या सासू सुनेमध्ये नेहमीच भांडणे होत असे. शनिवारी संध्याकाळी देखील त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. यावेळी मुलगा महेंद्र हा घरात नव्हता. सासू वनिता आणि सून मानसी या दोघीच घरी होत्या. नेहमीचेच भांडण असल्याने शेजाऱ्यांनी देखील जास्त लक्ष दिले नाही. परंतु भांडण पराकोटीला गेले. सुनेला राग अनावर झाला आणि रागाच्या भरात तिने घरातील काठी घेऊन सासू वनिता यांना काठीने मारहाण केली.

मारहाण केल्यानंतर सासूला जोरदार धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन सासू थेट समोरच असलेल्या टेबलावर आदळली. टेबलाचा जबरदस्त धक्का तिच्या डोक्याला बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत चिपळूण पोलिसांना रविवारी सकाळी माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण माहिती आणि चौकशी केल्यानंतर सून मानसी महेंद्र जडयाळ हिला ताब्यात घेत, तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

गृहप्रवेशाच्या पूर्वसंध्येला घडली घटना

वनिता जडयाळ यांचा मुलगा नोकरीनिमित्त मुंबईत असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे तो गावी अनेक दिवस गावी आहे. या कालावधीत या कुटुंबीयांनी मोठ्या मेहनतीने नवीन घर बांधले. या नवीन वास्तूत गृहप्रवेश सोमवारी होणार होता. मात्र, त्याची तयारी सुरू असतानाच ही दुर्देवी घटना घडली. यावेळी वनिता जडयाळ यांचा मुलगा वास्तूशांतीचे निमंत्रण देण्यासाठी गावात गेला होता. अशात घरात सासू-सुनेत वाद झाला आणि ही घटना घडली.

हेही वाचा- मुंबईत 25 तारखेला होणार राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद

आणखी एका महिलेचा मृत्यू

वनिता जडयाळ हिचा मृत्यू झाल्यानंतर शेजारी राहणारी अनिता अनंत जड्याळ (वय ५५) तिला पाहण्यासाठी येत होती. तिचा पाय घसरल्याने अनिता दारात ती पडली आणि जाग्यावरच तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनिता जडयाळ हिच्या मृत्युची नोंद केली असून सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

loading image