esakal | मुंबईत 25 तारखेला होणार राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत 25 तारखेला होणार राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद

मुंबईत 25 तारखेला होणार राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : मुंबई (mumbai) येथील माथाडी भवनात शुक्रवारी (ता. २५) राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद(statewide maratha reservation golmej council)होत असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सुरेश पाटील व विजयसिंह महाडिक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. चौदा विषयांवर सरकारची पोलखोल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (statewide-maratha-reservation-golmej-council-at-mathadi-bhavan-mumbai-kolhapur-news)

पाटील म्हणाले, "परिषदेस केंद्रिय सामाजिक राज्य मंत्री रामदास आठवले, खासदार नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नरेंद्र पाटील, आमदार प्रसाद लाड व आमदार रमेश पाटील यांच्यासह इतिहास तज्ज्ञ, सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे समन्वयक, राज्यातील ४२ विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांबाबत आंदोलनाची दिशा परिषदेत ठरविण्यात येणार आहे."

ते म्हणाले, "शासनावर दबाव टाकल्याखेरीज आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या संघटनांनी घरात बसू नये. मागासवर्ग आयोगावर आमचा विश्वास नाही. आयोगाची पुर्नरचना करुन मराठा सदस्य घ्यावेत. तसेच आरक्षणाकरिता शासनाने पुर्नयाचिका दाखल करावी.

हेही वाचा- रत्नागिरीत जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा रूग्ण नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

महाडिक म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत शासनाने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास दोन हजार कोटींची तरतूद करावी, सारथी संस्थेलाही दोन हजार कोटी निधी तत्काळ मंजूर करावा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी ६०० कोटींची तरतूद करावी, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी ८० कोटी मंजूर करावेत, मराठा आरक्षणासाठी आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व त्यांच्या कुटुंबाला दहा लाख सानुग्रह मदत करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या परिषदेत करण्यात येणार आहेत."

पत्रकार परिषदेस भरत पाटील, शिवाजीराव लोंढे, जयदीप शेळके, सचिन साठे, विकास साळोखे, अनिकेत आयरेकर, मारुती जांभळे, मिथुन ठाकूर, यशवंत शिंदे, युवराज पाटील, आनंद पाटील उपस्थित होते.

loading image
go to top