रत्नागिरी : उक्षी येथे पर्यटकांची मोटार कोसळली नदीत; एकजण बेपत्ता

संदेश सप्रे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

  • पर्यटकांची मोटार सायंकाळी साडेचारच्या सुमारास उक्षी गावातील नदीत कोसळली.
  • एक पर्यटक बेपत्ता. पाचजण बचावले
  • हे सर्व पर्यटक जिंदाल कंपनीचे कर्मचारी
  • बेपत्ता असलेल्या पर्यटकाचे नाव करुणा मूर्ती 

संगमेश्वर - पर्यटकांची मोटार सायंकाळी साडेचारच्या सुमारास उक्षी गावातील नदीत  कोसळली. यात एक पर्यटक वाहून गेला असून पाचजण बचावले आहेत. हे सर्व पर्यटक जिंदाल कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती आहे. मुंबई गोवा महामार्गावर वांद्री नजीकच्या उक्षी गावात असणाऱ्या धबधब्यावर फिरण्यासाठी ते आले होते. बेपत्ता असलेल्या पर्यटकाचे नाव करुणा मूर्ती असे असून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेत आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिंदाल कंपनीत कामाला असणारे करुणा मूर्ती , हेरंब कदम , अतुल करंदीकर , प्रसाद शिर्के , प्रशांत म्हात्रे , पराग पेडणेकर हे मित्र आज दुपारी उक्षी धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी गेले होते. धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटल्यानंतर सर्व जण मोटारीने घरी परतत असतांना त्यांची मोटार उतारात एका दगडावर आदळली व मोटार शंभर फुट खोल नदीत कोसळली. अपघाता दरम्यान पाचजण मोटारीतून बाहेर पडले पण या घटनेत करुणा मूर्ती बेपत्ता झाले  आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने करुणा मूर्ती यांचा शोध घेत आहेत. पावसाचा जोर सतत वाढत असल्याने शोध कार्यात अडथळा येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Motor fall in river in Ukshi Ratnagiri