महागाईचा डोंगर; श्रींच्‍या मूर्ती घडवणे झाले डोईजड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati Idol

महिनाअखेरीला होणाऱ्‍या गणेशोत्सवाच्या आगमनाचे साऱ्‍यांनाच वेध लागले असून गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सध्या गणेश कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे.

महागाईचा डोंगर; श्रींच्‍या मूर्ती घडवणे झाले डोईजड

राजापूर - महिनाअखेरीला होणाऱ्‍या गणेशोत्सवाच्या आगमनाचे साऱ्‍यांनाच वेध लागले असून गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सध्या गणेश कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. बाजारपेठेतील वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यामध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. त्याचा सामना मूर्तिकारांनाही करावा लागत असून गणेशभक्तांना यावर्षी मूर्तीच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे. अवघ्या दहा-बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या या गणेशोत्सवाचे साऱ्‍यांना वेध लागले आहे.

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या शाडूच्या मातीच्या किंमतीमध्येही यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. ही माती कोकणामध्ये मिळत नसून परराज्यातून आणावी लागते. सर्वसाधारणपणे ही माती किलोवर खरेदी न करता पोत्यावर केली जात असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक पोत्याच्या किंमतीमध्ये ३० ते ३५ रुपये दराने वाढ झाली आहे. त्यातच वाढलेला वाहतूक खर्च आणि गणेशमूर्ती तयार करण्यासाठी अन्य लागणार्‍या साहित्याच्या वाढलेल्या किंमती, कारागारांची वाढलेली मजुरी या सार्‍या स्थितीमध्ये गणेशशाळा चालवणे आणि गणेशमूर्ती तयार करणे कारखानदारांना डोईजड झाले आहे. त्याचा परिणाम गणेशमूर्तीच्या किंमती वाढणार आहेत.

एक नजर..

* गणेशमूर्ती लहान- एक फुटाची १२०० रुपये

* गणेशमुर्ती मोठी- ४ ते १२ हजार रुपये

* कामगाराची एक दिवसाची मजुरी- ५०० रुपये

* मातीची किंमत- ५० किलोचे पोते- २५० ते ४०० रुपये

* साच्यांची किंमत- ४ ते ५ हजार रुपये

* राजापूर तालुक्यातील कार्यशाळा- १५०

Web Title: Mountain Of Inflation Making Idols Of Ganpati Was Done

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..