esakal | मिनी रिफायनरीसाठी सिंधुदुर्गात हालचाली
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

मिनी रिफायनरीसाठी सिंधुदुर्गात हालचाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर: नाणारमधील सुमारे साडेआठ हजार एकर जमीनमालकांनी प्रकल्पासाठी समर्थन करूनही शिवसेनेच्या राजकीय ईर्ष्येतून नाणार परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प नाकारण्यात आलेला असताना बारसू-सोलगावच्या पर्यायी जागेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यासाठी बारसू-सोलगाव भागातील ग्रामस्थही आग्रही आहेत. मात्र, त्याचवेळी सुमारे वीस मेट्रीक टनच्या मिनी रिफायनरी सिंधुदुर्गात उभारण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बहुचर्चित, लाखो रुपयांची गुतंवणूक आणि त्यातून विविधांगी प्रकारची रोजगार निर्मिती करणाऱ्‍या रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी शासनापुढे आता जागांचे पर्याय खुले झाले आहेत.

नाणारला पर्याय म्हणून तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरातील जागेचा नवा पर्याय पुढे आला आहे. कातळपड परिसर, शून्य विस्थापन आणि समुद्र किनारपट्टीजवळ अशा विविध जमेच्या बाजू असलेल्या या परिसरामध्ये रिफायनरी उभारणीला लोकांनीही संमती दर्शविली असून तशी मागणीही शासनाकडे केली आहे. सोलगाव-बारसू परिसरामध्ये रिफायनरी उभारणीला लोकांसह राजकीय पक्ष आणि प्रकल्प उभारणी करणारी कंपनीही आग्रही असल्याचे सद्यःस्थितीमध्ये चित्र आहे.

हेही वाचा: 'खऱ्या आयुष्यात महात्मा गांधी दिसतात का?'; शाहरुखच्या प्रश्नावर संजय दत्त म्हणाला..

नवा प्रस्ताव आला पुढे

दरम्यान, नव्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजयदुर्ग बंदरापासून जवळ असलेल्या ठिकाणी मिनी रिफायनरी प्रकल्प उभारणीचा नवा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यासाठी सुमारे चार हजार एकर जागेचे संमतीपत्रही जागा मालकांनी दिली असून त्यातून मिनी रिफायनरी उभारण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. विजयदुर्ग बंदरनजीक या जागेला अधिक पसंती देण्यात येत आहे.

हेही वाचा: श्रेयसला कमाई विचारणारी मायरा एका एपिसोडमधून किती कमावते?

पटोलेंसह भाजप, मनसेचे समर्थन..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सव्वा लाख रोजगार निर्माण करणारा रिफायनरी प्रकल्प होणारच, अशी गर्जना नुकतीच जन आशीर्वाद यात्रेदरम्याने राजापुरात केली होती. या वेळी त्यांनी नाणार होणारच, असे स्पष्ट केले होते तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील राजापूरच्या दौऱ्‍यात नाणार करणार अशी भूमिका मांडली होती. भाजपने याआधीच प्रकल्पाला पाठिंबा दिला असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर खुलेपणाने प्रकल्पाला समर्थन दिले आहे.

एक नजर

  1. नाणारला ८ हजार ५०० जमीन मालकांची संमती

  2. शिवसेनेच्या राजकीय ईर्ष्येतून नाणार मागे

  3. बारसू-सोलगाव नवा जागेचा पर्याय

  4. बारसू-सोलगाव भागातील लोक आग्रही

loading image
go to top