esakal | 'खऱ्या आयुष्यात महात्मा गांधी दिसतात का?'; शाहरुखच्या प्रश्नावर संजय दत्त म्हणाला..
sakal

बोलून बातमी शोधा

lage raho munna bhai

'खऱ्या आयुष्यात महात्मा गांधी दिसतात का?'; शाहरुखच्या प्रश्नावर संजय दत्त म्हणाला..

sakal_logo
By
स्वाती वेमूल

२००६ साली प्रदर्शित झालेला 'लगे रहो मुन्ना भाई' of Lage Raho Munna Bhai हा अभिनेता संजय दत्तच्या sanjay dutt करिअरमधील एक सुपरहिट चित्रपट आहे. 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटाचा हा दुसरा भाग होता आणि दोन्ही चित्रपटात संजूबाबाने मुन्नाभाईची भूमिका दमदार साकारली. 'लगे रहो..' या चित्रपटाची कथा महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित असून चित्रपटात मुन्नाभाईला चक्क गांधी दिसू लागतात, असं दाखवण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी बापूजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण होत असताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुला खऱ्या आयुष्यातही महात्मा गांधी दिसतात का, असं प्रश्न शाहरुख खान shah rukh khan हा संजय दत्तला विचारताना या व्हिडीओत दिसतोय.

२०१० मध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. शाहरुख आणि संजूबाबा मंचावर असतात आणि तेव्हा किंग खान त्याला प्रश्न विचारतो, "तुला खऱ्या आयुष्यातही गांधीजी दिसतात का?" या प्रश्नावर संजय दत्त म्हणतो, "होय, मला खऱ्या आयुष्यात देखील बापूजी दिसतात. हे बघा, ते इथेच बसले आहेत." उत्तर देताना संजूबाबा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीकडे बोट करून दाखवतो. ती व्यक्ती असते, यश चोप्रा. त्यांच्या केसांमुळे ते बापूजींसारखे दिसले, असं नंतर संजय दत्त गमतीशीरपणे म्हणतो आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

हेही वाचा: मुंबईत आजही मी भाड्याच्या घरात राहतो- अनुपम खेर

'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटाचं दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केलं. चित्रपटात संजय दत्तसोबत अभिनेता अर्शद वारसीने सर्किटची भूमिका साकारली होती. मुन्ना आणि सर्किट यांची जोडी तुफान हिट झाली.

loading image
go to top