नीतेशच्या कृत्याबद्दल नारायण राणेंनी मागितली माफी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

नवी दिल्ली - नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य चुकीचे असून मी त्या अधिकाऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये घडलेल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्यांच्या अंगावर चिखलाची बादली ओतली होती. तसेच या अधिकाऱ्याला पुलाला बांधण्याचा प्रयत्न केला होता.

नवी दिल्ली - नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य चुकीचे असून मी त्या अधिकाऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये घडलेल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्यांच्या अंगावर चिखलाची बादली ओतली होती. तसेच या अधिकाऱ्याला पुलाला बांधण्याचा प्रयत्न केला होता.

राणे यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी नीतेश राणे यांनी या प्रकरणावर एका वाहिनीशी बोलताना आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचे जोरदार समर्थन केले आहे. या अधिकाऱ्यांना असाच धडा शिकवला पाहिजे, अशी भाषा त्यांनी वापरली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयवर्गीय यांच्या मुलाचे प्रकरण ताजे असताना आता राणे यांच्याबाबत व त्यांच्या मुलाच्या बाबत भाजप काय भूमिका घेणार अशा प्रश्‍न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश याला भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane comment on Nitesh Rane Dabhanggiri