MP Narayan Rane
MP Narayan Raneesakal

MP Narayan Rane : 'राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तरी फरक पडत नाही, ते महाराष्ट्राला काय देणार?' खासदार नारायण राणेंचा सवाल

MP Narayan Rane : "जवळपास एक लाख रोजगार देण्यासाठी आणि तशा प्रकारचे उद्योग आणण्यासाठी उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे."
Published on

सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) होणारा विरोध आणि समस्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे. यामध्ये समस्यांचे निराकरण केले जाईल; मात्र विकासाच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी येथे दिला. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांच्या इको सेन्सिटिव्ह झोनबाबत केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन. काहीच न झाल्यास त्या भागात कसा विकास साधायचा, याबाबत बैठक घेऊन सांगड घालेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com