पंचनामे न करता कोकणसाठी हेक्‍टरी 50 हजाराची भरपाई द्या

राजेश शेळके
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

रत्नागिरी - अतिवृष्टीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात मोठे नुकसान झाले. ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीत कोसळलेली घरे, खचलेली मने आदी जोडण्यासाठी संवेदनशीलतेने शासनाने पुढे जायला हवे. सेल्फी टाळा, पत्रकारांवर रागावणे सोडा, असा टोला देत पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजाराची भरपाई द्या, ही मागणी आहे. आपत्तीबाबत सरकार गंभीर नाही. सरकारला शिकायची गरज आहे, अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली. 

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यात सरकार अपयशी ठरले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार इतर गोष्टींवर अधिक भर देत आहे. जनजीवन सुरळीत करण्यासाठी लोकांना मोकळ्या वातावरणात ठेवण्याची गरज आहे; मात्र मंत्र्यांविरोधात वातावरण होत असल्याचे कारण देत जमाव बंदी करत आहे. हे लोकशाहीला घातक असून सरकारने ही गोष्ट गांभीऱ्याने घेतली पाहिजे. 2005 ला निर्माण झालेल्या परिस्थितीला काँग्रेस आघाडीचे सरकार चांगल्या पध्दतीने सामोरे गेले होते.

तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या अनुभव सरकारने विचारात घेतला पाहिजे. राष्ट्रवादी सरकारला सहकार्य करण्यास तयार आहे. लोकांच्या उद्रेकावर राज्यकर्त्यांनी संयम ठेवण्याची आवश्‍यकत आहे. पश्‍चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणातील जिल्ह्यानाही पूराचा फटका बसला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती पाण्यात राहिल्यामुळे कुजून गेली आहे. त्यांना तत्काळ भरपाई मिळणे गरजेचे आहे. येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन शेतकऱ्यांना हेक्‍टरी पन्नास हजार रुपये भरपाई मिळावी, अशी आमची मागणी आहे. शासनाने माणशी पाच हजार रुपये मदत प्रत्येकाला दिली पाहिजे अशीही आमची मागणी आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले आहे. 

मदत पिशव्यांवर पक्षाचे स्टीकर उचित नाही

राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. लोकांना मदतीची आणि आधाराची गरज आहे. त्यासाठी सर्व हात सरसावत असताना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवर स्वतःचे फोटो छापणे योग्य नाही. तुमच्या पक्षाकडून मदत दिली असती तर पक्षाच्या प्रचारासाठी स्टीकर लावा. पण वाईट प्रसंगात शासकीय मदतीतून प्रचार करणे योग्य नाही, असे तटकरे यांनी सुनावले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sunil Tatkare comment