esakal | खासदार सुनील तटकरे कोकणातील महाआघाडीबाबत म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sunil Tatkare Comment On Mahavikas Aghadi In Konkan

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. श्री. तटकरे म्हणाले, कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महाआघाडीतील तिन्ही घटक पक्षांची समन्वयक समिती निर्माण करण्यात येईल.

खासदार सुनील तटकरे कोकणातील महाआघाडीबाबत म्हणाले...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मंडणगड ( रत्नागिरी ) - राज्याचा सत्ताकारणात महाआघाडीच्या राजकारणाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आगामी काळात कोकणात राष्ट्रवादी, सेना व कॉंग्रेस या राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधून ही मोट अधिक घट्ट करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. श्री. तटकरे म्हणाले, कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महाआघाडीतील तिन्ही घटक पक्षांची समन्वयक समिती निर्माण करण्यात येईल. तिच्या माध्यमातून तिन्ही पक्षांची मोट घट्ट बांधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत; मात्र असे करताना पक्षवाढीलाही महत्व दिले जाईल. कोरोनाचा सगळ्यांनी एकत्रित सामना करत संकटावर एकत्रपणे मात करण्याची आवश्‍यकता आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी, तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी पक्षातील संघर्ष टाळत अधिक समन्वयाची गरज व्यक्त केली. मेळाव्याला माजी आमदार संजय कदम, जिल्हा सरचिटणीस अजय बिरवटकर, चित्रा चव्हाण, रमेश दळवी, प्रकाश शिगवण, अनिल रटाटे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर आदी उपस्थित होते. 

सर्व नियम बाजूला ठेवून शासकीय मदत 
आमदार शेखर निकम यांनी चक्रीवादळामुळे क्षतिग्रस्त झालेल्या मंडणगड व दापोली तालुक्‍यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्व नियम बाजूला ठेवून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.