esakal | कोकणातून आंब्यांची भेट; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातून आंब्यांची भेट; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

कोकणातून आंब्यांची भेट; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : फळांचा राजा आंबा हा प्रत्येकाला आवडतोच. त्यात तो हापूस (kokan hapus) असेल तर त्याचं विशेष कौतुक असतं. यावरुनच खासदार सुप्रिया सुळे (supeiya sule) यांनी ट्वीट मधून कोकणातल्या विविध जातीच्या आंब्याचा एक फोटो शेअर केला आहे. हे आंबे त्यांना चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम (MLA shekhar nikam) यांनी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (MP supriya sule share a kokan mangoes photo on her tweeter)

ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी रत्ना, सिंधू, पायरी, पुलीवोरा, क्रिपींग, मल्लिका, केंट, आम्रपाली, केशर आणि चंद्रमा या जातीचे आंबे पाठविले आहेत. अशी आंब्याची विविधता मला खूप आवडते. अशा शब्दांत त्यांना या कोकणरुपी आंबा भेटीचे कौतुक केले आहे. (various types of mango in konkan)

हेही वाचा: दिल्लीतही राज्य करतो, देवगडचा राजा; महिलांचा प्रयोग यशस्वी

दरम्यान कोकणचा हापूस जगभर प्रसिद्ध आहे. रत्नागिरी, देवगड हापूस, पायरी, आम्रपाली, केशर, चंद्रमा या कोकणातल्या काही प्रसिद्ध जाती आहेत. हापूसला सर्वात जास्त मागणी आणि पसंती दिली जाते. कोकण म्हटलं की आंबा आणि काजूची विशेष ओळख असते. कोकणातील या रानमेव्याचे खास आकर्षक अनेकांना असते. आणि कुणी भेट पाठवली तर विशेष कौतुकही असते.