Loksabha 2019 : खंबाटा डुबण्याचे खापर आमच्यावर नको - राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराबाबत अपक्ष उमेदवार नीलेश राणे यांनी माझ्यावर केलेला आरोप बिनबुडाचा आहे. कंपनीत तीन कामगार युनियन होत्या. त्यांमध्ये नीतेश राणेदेखील होते. ही कंपनी मालकाचे दुर्लक्ष, बेशिस्त आणि भ्रष्टाचारामुळे डुबली. याचे खापर आमच्यावर फोडू नका. स्वतःचा भाऊ नितेश राणे याच्याशी पटत असेल तर नीलेश राणेने त्यांना विचारावे, असे प्रत्युत्तर युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले. 

रत्नागिरी - खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराबाबत अपक्ष उमेदवार नीलेश राणे यांनी माझ्यावर केलेला आरोप बिनबुडाचा आहे. कंपनीत तीन कामगार युनियन होत्या. त्यांमध्ये नीतेश राणेदेखील होते. ही कंपनी मालकाचे दुर्लक्ष, बेशिस्त आणि भ्रष्टाचारामुळे डुबली. याचे खापर आमच्यावर फोडू नका. स्वतःचा भाऊ नितेश राणे याच्याशी पटत असेल तर नीलेश राणेने त्यांना विचारावे, असे प्रत्युत्तर युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले. 

खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराला खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पावणेतीन हजार कामगार, त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागले. खंबाटाचा भ्रष्टाचार सुमारे चारशे कोटींचा असल्याचा आरोप स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणेंनी केला होता.

त्याचा प्रतिवाद करताना राऊत म्हणाले, ‘‘लोकसभेच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराला काल आम्ही संगमेश्‍वर येथून महायुतीने सुरवात केली. जिल्हा परिषद गटनिहाय होणाऱ्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र अपक्ष उमेदवार नीलेश राणे यांनी खंबाटा कंपनीबाबत माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले. त्याला उत्तर देणे, हे माझे कर्तव्य आहे. मुळात या कंपनीमध्ये तीन संघटना कार्यरत होत्या. पैकी एका संघटनेमध्ये नीलेश यांचे बंधू आमदार नीतेश राणे होते.

युनियन मान्यताप्राप्त नसल्या तरी स्वाक्षरीचा अधिकार होता. त्यानुसार काही करार झाले. काम चांगल्या पद्धतीने सुरू होते; मात्र कंपनीच्या मालकाने दुर्लक्ष केले, बेशिस्त वागणुकीमुळे आर्थिक डोलारा कंपनीला पेलला नाही. त्यामुळे कंपनी डुबली, त्याचे खापर माझ्यावर फोडू नका. काही कर्मचारी येऊन बोलत होते. तसे माझ्या संघटनेचे कर्मचारी मी बोलावू शकतो; परंतु कामगारांना न्याय मिळावा, त्यांची देणी कंपनीने द्यावी, यासाठी हे प्रकरण न्यायालयात आहे. सुमारे अडीच कोटीची देणी कंपनीची मालमत्ता विकून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील केली आहे. स्वतःच्या भावाशी पटत असेल्यास तर नीलेशने माहिती घ्यावी.’’

नीलेश राणे निष्क्रिय
नीलेश राणेंनी मला शहाणपण शिकवू नये. खासदार असताना पाच वर्षांमध्ये डीआरडीएची एक बैठक घेऊ शकले नाहीत. खासदार निधीतील दोन कोटी ३२ लाख रुपयाचा त्यांचा विकास निधी मी वापरला. यावरून ते स्वतः किती निष्क्रिय आहेत, हे लक्षात येते, अशी कोपरखळीही विनायक राऊत यांनी मारली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Vinayak Raut comment