esakal | शिवसेनेला संपवण्याची भाषा करणारे विसर्जित
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेला संपवण्याची भाषा करणारे विसर्जित

मालवण - शिवसेना संपविण्याची भाषा अनेकांनी केली; मात्र अशी भाषा करणारेच विसर्जित झाले व याउलट शिवसेना फोफावत राहिली. शिवसेना हे एक कुटुंब असून या कुटुंबात आज आंबडोसचे नेतृत्व, माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी प्रवेश केला. येत्या काळात संपूर्ण आंबडोस गाव शिवसेनेच्या पाठीशी राहील, असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला. 

शिवसेनेला संपवण्याची भाषा करणारे विसर्जित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालवण - शिवसेना संपविण्याची भाषा अनेकांनी केली; मात्र अशी भाषा करणारेच विसर्जित झाले व याउलट शिवसेना फोफावत राहिली. शिवसेना हे एक कुटुंब असून या कुटुंबात आज आंबडोसचे नेतृत्व, माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी प्रवेश केला. येत्या काळात संपूर्ण आंबडोस गाव शिवसेनेच्या पाठीशी राहील, असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला. 

आंबडोस येथील रवळनाथ मंदिरात आयोजित कार्यक्रमात आंबडोसचे माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह ग्रामस्थांनी खासदार राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, संजय गावडे, मंदार गावडे, आशिष परब, बाळ महाभोज, विजय पालव, अमित भोगले, बाबी जोगी, मंदार शिरसाट, विशाल धुरी, दिनेश चव्हाण, आतू फर्नांडिस, श्री. सावंत, उपसरपंच भारती आयरे, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कदम, बाबू परब, शीतल कदम, दयानंद पाटकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, ‘‘प्रत्येक वाडीत कृषी बॅंक व्हावी, यासाठी आपले प्रयत्न आहेत.  स्वयंरोजगाराच्या माध्यमातून घरच्या घरी पैसे कसे कमविता येतील, यादृष्टीकोनातून अनेक योजना आहे. त्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यायला हवा.

आमदार नाईक म्हणाले, ‘‘आंबडोसचे माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांना योग्य मानसन्मान  दिला जाईल. ग्रामस्थ जी भूमिका मांडतील, ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील. 

काम करण्याच्या पद्धतीमुळेच...
खासदार राऊत, आमदार नाईक यांच्या माध्यमातून गावातील अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे १०० टक्के गाव सेनेच्या पाठीशी, राहील असा विश्‍वास दिलीप परब यांनी यावेळी दिला.

ते मंत्रीही होतील
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे येथील जनता पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्‍वास टाकून त्यांना आमदार बनवतील. ते मंत्रीही होतील.

loading image
go to top