नारायण राणेंचा विषय शिवसेनेसाठी केव्हाच संपलाय 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 August 2019

वैभववाडी - नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. मात्र, शिवसेनेसाठी नारायण राणे प्रकरण केव्हाच संपलंय, असे मत शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केले. 

खासदार श्री. राऊत यांनी चिंचवली, वैभववाडी रेल्वेस्थानकांची पाहणी केली. तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांच्यासोबत नागेंद्र परब, सचिन सावंत, सुशांत नाईक, मंगेश लोके, पल्लवी झिमाळ, नंदू शिंदे आदी उपस्थित होते. 

खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. परंतु, त्याचबरोबर त्यांनी शिवसेना-भाजपची युती आहे. त्यामुळे शिवसेनेशी चर्चा करून उचित निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. याबाबत विचारणा केली असता

खासदार राऊत म्हणाले, ""यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी शिवसेना पक्षप्रमुखांचा आहे. ते योग्य तो निर्णय घेतील. परंतु, शिवसेनेसाठी नारायण राणे प्रकरण कधीच संपलेले आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Vinayak Raut comment on Narayan Rane