
सर्वांना समान न्याय देण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. पोहरादेवीवर केलले शक्तीप्रदर्शन कोरोना काळात करणे चुकीचे होते
रत्नागिरी : संजय राठोड प्रकरणी चौकशीअंती दोषींवर नक्कीच कारवाई होईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातील मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील. सर्वांना समान न्याय देण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. पोहरादेवीवर केलले शक्तीप्रदर्शन कोरोना काळात करणे चुकीचे होते. विदर्भात कोरोना वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी तिथे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी जमणे आणि जमवणे योग्य नाही, असा खुसाला शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केला.
रत्नागिरी दौर्यावर असताना शासकीय विश्रामगृहात पत्रकाराशी झालेल्या अनौपचारीक चर्चेवेळी ते म्हणाले, या प्रकरणात कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यातून कोणी सुटणार नाही. 13 आँडिओ क्लिपची चौकशी करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानुसार चौकशी होईल. संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री नाराज आहेत, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, याबाबत मला काही माहित नाही.
हेही वाचा- आठ एकरातील ऊसाला आग ; बिद्रीतील घटना
संजय राठोड प्रकरणात महाविकास आघाडीमध्ये खदखद नाही. जो कोण चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत. संजय राठोड प्रकरणात भाजपचे आरोप चुकीचे आहेत. आरोप करण्यापलिकडे भाजपकडे काही उरले नाही. संजय राठोड प्रकरणात निःपक्षपाती चौकशी होणार. चित्रा वाघ यांनी आरोप करताना मुख्यमंत्र्याचे कौतुक केले आहे. या घटनेची पूर्ण दखल मुख्यमंत्र्यांनी गांर्भीयाने घेतली आहे, असे सष्टीकरण खासदार विनायक राऊत यांनी दिले.
भाजप आक्रस्ताळेपणा करतय
भाजप आक्रस्ताळेपणा करून नाव गोवण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय दबावाला बळी पडून कोणतीही कारवाई मुख्यमंत्र्यांनी करणं योग्य नाही, असा मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले.
संपादन- अर्चना बनगे