आठ एकरातील ऊसाला आग ; बिद्रीतील घटना  

 Eight acres of sugarcane fire Incidents in Bidri farmer marathi news
 Eight acres of sugarcane fire Incidents in Bidri farmer marathi news
Updated on: 

बिद्री (कोल्हापूर) : शॉर्टसर्कीटमुळे आग लागून सुमारे आठ एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने चौदा शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना कागल तालुक्यातील बिद्री येथे आज घडली.


याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, 

पानंद रिंगरोड असलेल्या गावंदर नावाच्या शिवारात शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. दुपारची वेळ असल्याने आग झपाट्याने पसरली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. काही शेतकऱ्यांनी धाडसाने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीच्या ज्वालांपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते.

शेतकऱ्यांनी बिद्री साखर कारखान्याशी संपर्क साधल्यावर आग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. पण त्या उसाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अग्निशामक बंब तेथे पर्यंत पोहोचू शकले नाही . या घटनेत चौदा शेतकऱ्याचे सुमारे आठ एकर ऊसाचे मोठे नुकसान झाले.

बिद्री च्या पानंद भागात रस्ता नसल्याने आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली या रस्त्याबाबत ग्रामपंचायत व वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी प्रस्ताव दाखल केला आहे याबाबत कोणताच ठोस निर्णय झाला नाही वेळेवर निर्णय झाला असता तर एवढी मोठी घटना घडली नसती .अशा भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या .


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Illegal Lending
Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Marathi News Esakal
www.esakal.com