esakal | आयलाॅग प्रकल्पाबाबत खासदार राऊत यांचे का माैन ?
sakal

बोलून बातमी शोधा

MP Vinayak Raut No Comment On I Log Project Ratnagiri Marathi News

नाणार परिसरातील रिफायनरी प्रकल्पावरून गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार रणकंदन झाले आहे. सुरूवातीला शिवसेना विरूद्ध शिवसेना अशा रंगलेल्या वाक्‌युद्धानंतर गेले दोन दिवस प्रकल्प समर्थक आणि विरोधकांनी जाहीर सभा घेवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या प्रदर्शनानंतर नाणारचे आता पुढे काय होणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आयलाॅग प्रकल्पाबाबत खासदार राऊत यांचे का माैन ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - संघटनाविरोधी भूमिका घेवून नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेचे आणि पदाधिकाऱ्यांना जोड्याने मारा, असा आक्रमक पवित्रा शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी घेतला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आयलॉग प्रकल्पाला स्थगिती दिली तरीही त्याचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यांचे हे मौन बोलके ठरले. त्यामुळे शिवसेनेच्या आयलॉगबाबतच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

नाणार परिसरातील रिफायनरी प्रकल्पावरून गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार रणकंदन झाले आहे. सुरूवातीला शिवसेना विरूद्ध शिवसेना अशा रंगलेल्या वाक्‌युद्धानंतर गेले दोन दिवस प्रकल्प समर्थक आणि विरोधकांनी जाहीर सभा घेवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या प्रदर्शनानंतर नाणारचे आता पुढे काय होणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नाणारबाबत संघटनेविरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर सेना नेतृत्वाने कारवाई केली. एवढेच, नव्हे समर्थक पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत सागवे येथे नुकत्याच झालेल्या प्रकल्पविरोधी शिवसेनेच्या सभेमध्ये शिवसेना सचिव आणि खासदार राऊत यांनी नाणारचे समर्थन करणाऱ्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना जोड्याने मारा, असे वक्तव्य केले. मात्र, आयलॉगचे समर्थन करणाऱ्या पदाधकिाऱ्यांबाबत मौन पाळले. 

आंबोळगड किनाऱ्यावर उभारण्यात येत असलेल्या आयलॉग प्रकल्पालाही विरोध होत आहे. गतवर्षी या परिसरातील लोकांनी आयलॉगच्या विरोधात मोर्चाही काढला होता. त्यातच, जनसुनावणीच्यावेळी विरोधही केला होता. त्यामध्ये शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. 

विकासासाठी आयलॉग व्हावा 

काही दिवसांपूर्वी आंबोळगड भागातील काही प्रकल्पविरोधकांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदीत्य ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ठाकरे यांनी आयलॉग प्रकल्पाला स्थगिती दिली. ठाकरे यांच्या स्थगितीचे स्थानिक पातळीवर शिवसेनेमध्ये पडसाद उमटले. त्या परिसरातील शिवसैनिकांनी स्थगितीनंतर आयलॉगचे जाहीर समर्थन करत विकासासाठी आयलॉग व्हावा अशी मागणी केली. शिवसेनेच्या देवाचेगोठणे विभागाने आयलॉग प्रकल्पाला पाठिंबाही दिला आहे. त्यावर राऊत यांनी आयलॉगचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.