esakal | `त्या` वादग्रस्त टिप्पण्णीची दखल, खासदार राउत म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

mp vinayak raut statement ganesh festival, workers issue konkan sindhudurg

खासदार राऊत म्हणाले, ""गणेशोत्सव व मोहरम हे दोन सण शांततेत पार पडावे यासाठी पालकमंत्री सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक घेण्यात आली.

`त्या` वादग्रस्त टिप्पण्णीची दखल, खासदार राउत म्हणाले...

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवास यायचे असेल तर 7 ऑगस्टपूर्वी या, त्यानंतर जिल्ह्यात प्रवेश नाही. पाच हजार रुपये दंड होईल, अशा प्रकारची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची व्हायरल झालेली टिप्पणी रद्द केली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
क्वारंटाईन कालावधी 14 दिवसांवरुन 10 दिवसांचा करावा यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या आरोग्य विभागाकडे मागणी करावी, अशीही मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथून झूम ऍपद्वारे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी खासदार राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, रूची राऊत आदी उपस्थित होते.

यानंतर खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी चाकरमान्यांच्या गणेशोत्सव कालावधीत येण्यास बंदी घालण्यासाठी झालेल्या बैठकीचे "ती' वादग्रस्त टिप्पणी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. खासदार राऊत म्हणाले, ""गणेशोत्सव व मोहरम हे दोन सण शांततेत पार पडावे यासाठी पालकमंत्री सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक घेण्यात आली.

यावेळी सर्वांनी क्वारंटाईन कालावधी 7 दिवसांचा करण्यासाठी राज्य सरकारने कोकणसाठी खास बाब म्हणून केंद्राच्या आरोग्य विभागाकडे मागणी करावी. ही मागणी मान्य झाल्यावर येणारे चाकरमानी सात दिवस क्वारंटाईन राहतील. त्यानंतर 3 दिवस गर्दीत मिसळणार नाहीत, अशी नवी नियमावली बनविन्याच्या सूचना केल्या आहेत. येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास सुलभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या चाकरमान्यांने यायच्या अगोदर 48 तास कोरोना तपासणी करावी. यासाठी शासनाने मोफत अथवा एक हजार रूपयांत ही चाचणी उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी. टोल माफी करावी. त्यांना स्वस्त दरात एसटी बसेस उपलब्ध करून चाकरमान्यांना गावांत सोडण्यात यावे. या सर्व मागण्या जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासनाकडे पाठविणार आहेत.'' 

एकमेकांचा दुवा बना 
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी चाकरमानी येण्यास बंदी हा विषय बाहेर पडल्याने सर्वांनाच मनस्ताप झाला होता. आता हा विषय होणार नाही. त्यामुळे गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी प्रशासक व प्रशासन यांनी दुवा बनून काम करावे. खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये लवकरच कोरोना तपासणी सुरु होत आहे. तेथेही ही तपासणी सुरू करावी. आमदार वैभव नाईक यांनी ई-पास सुलभ करावे. एसटी उपलब्ध कराव्यात अशी मागणी केल्याचे सांगितले. अमित सामंत यांनी कंटेन्मेंट झोन मर्यादित करण्याची मागणी केली. बाळा गावडे यांनी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी केली. 

अजुन एक बैठक होणार
व्हायरल झालेली टिपणी प्राथमिक स्वरूपाची चर्चा होती. तो संभाव्य निर्णयच रद्द करण्यात आला आहे. आता जिल्हास्तरीय शांतता समितिची अजुन एक बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी भजन, आरती, विसर्जन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सूचनांचे पालन करून विसर्जनास 10 ते 20 माणसांना परवानगी देण्याची चर्चा झाली आहे. तसेच सामुदायिक घरगुती (सार्वजनिक नाही) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आल्याचे यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले.

संपादन ः राहुल पाटील

loading image