Mrugagad Fort : मृगगडावरून पाय घसरून एक ट्रेकर गंभीर जखमी

शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा व अपघातग्रस्तांसाठी असलेल्या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी शर्तीच्या प्रयत्नांनी आणले खाली
Mrugagad Fort
Mrugagad Fort Sakal

पाली : सुधागड तालुक्यातील मृगगड किल्ल्यावर चढतांना पायऱ्यांवरून पाय घसरून खाली पडून रविवारी नवी मुंबईतील एक ट्रेकर गंभीर जखमी झाला. या ट्रेकरला शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा व अपघातग्रस्तांसाठी असलेल्या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप खाली आणले.

या बाबत सविस्तर माहिती अशी की सुधागड तालुक्यातील मृगगड हा अवघड गड सर करण्यासाठी नवी मुंबई येथून काही ट्रेकर आले होते. पावसामुळे निसरड्या झालेल्या पायरीवरून पाय सरकल्याने खाली पडून यातील एक ट्रेकर अदनान शफिक खान (वय 38) जवळपास 100 किलो वजनाचा हा तरुण गंभीर जखमी झाला.

त्याचे डोकं फुटले, गुडघ्याला दुखापत झाली खांदाही निखळला, गंभीर जखमी झालेल्या अदनानला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता होती. अदनानला गडावरुन सुखरुप खाली आणणं अत्यंत जिकिरीचं व अवघड काम होतं.

शिवदुर्ग मित्र मंडळाचे सुनील गायकवाड यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला याबाबत माहिती दिली. या सगळ्याची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता शिवदुर्ग मित्र मंडळ, लोणावळा व अपघातग्रस्तांसाठी असलेल्या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

डोक्याला दुखापत, खांदा निखळणे, गुडघ्याला दुखापत जायबंदी झालेल्या अदनान शफिक खानला अवघड अश्या मृगगडावरून खाली गडाच्या पायथ्याशी आणून तात्काळ पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना करण्यात आले.

माहिती साहित्य व काळजी आवश्यक

पावसाळ्यात गडदुर्गांवर ट्रेक करण्याचा प्लॅन अनेक जण आखत असतात. मात्र अवघड ट्रेक करण्यासाठी सोबत माहितगार व अत्यावश्यक साहित्य असणंही अत्यंत आवश्यक आहे. छोटीशी चूकही जीवावर बेतण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत, त्यामुळे असे ट्रेक करताना पुरेशी काळजी घ्यावी लागते.

तत्काळ मदत

नेहमीच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी शिवदुर्ग मित्र मंडळ, लोणावळा या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते तत्पर असतात. त्यांनी आजवर अनेकांचे जीवही वाचवले आहेत. आपत्कालीन प्रसंगात अनेकांच्या मदतीला धावून जाणारी ही शिवदुर्गांची संस्था आहे. त्यांच्या मदतीने ट्रेकर अदनान खान याला जखमी अवस्थेत मोठ्या मुश्किलीने पायथ्याशी आणले गेले. या मोहिमेत स्थानिक गावकऱ्यांची देखील मोलाची मदत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com