esakal | महावितरणलाच शॉक! थकबाकी गेली ६४ कोटींवर
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL company shauk arrears gone up to Rs 64 crore

१ लाख ५९ हजार ग्राहक; वसुलीसाठी आटापिटा सुरू, आर्थिक गणित बिघडले

महावितरणलाच शॉक! थकबाकी गेली ६४ कोटींवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: टाळेबंदीनंतर वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीला मोठा आटापिटा करावा लागत आहे. या आठ महिन्यातील बिल न भरणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्यांच्याबरोबर महिन्याला बिल थकविणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. गेल्या एका महिन्यात १ लाख ५९ हजार ८२६ ग्राहकांची सुमारे ६४ कोटीची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्य आणि लघुदाब ग्राहकांचा समावेश आहे. 

कोरोनाच्या संकटाबरोबर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा महावितरण कंपनीला बसला आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, रत्नागिरी तालुक्‍यात सुमारे ३२ कोटीचे नुकसान झाले. यातून सावरताना महावितरण कंपनीला तारेवरची कसरत करावी लागली. त्यानंतर पेच निर्माण झाला तो वाढीव बिलांचा. टाळेबंदीच्या काळात एकदम ३ महिन्याची आलेली बिले ग्राहकांना शॉक देणारी होती. ही वाढीव बिले न भरण्याच्या मानसिकतेत अजूनही काही ग्राहक आहेत. त्यात सरकारने यात सवलत देण्याचा दावा केला होता;

मात्र कालच ऊर्जामंत्र्यांनी सर्व वीज ग्राहकांचा गैरसमज दूर करत कोणतीही सवलत देणार नसल्याचा शॉक दिला. काही राजकीय पक्षांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात चांगलाच उठाव केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे, अशा परिस्थितीत महावितरण कंपनीचे थकबाकीमुळे आर्थिक गणित बिघडले आहे. 

हेही वाचा- भाजप नेत्यांना पडला विसर; बेळगाव जिल्हा विभाजनाचे काय ?


जिल्ह्यात गेल्या एका महिन्याची पूर्ण थकबाकी सुमारे ६४ कोटीवर गेली आहे. यामध्ये १ लाख ३९ हजार ९५९ घरगुती ग्राहक आहेत. त्यांची थकीत रक्कम ४० कोटी ८८ लाख आहे. १७ हजार ५०४ वाणिज्य ग्राहक असून त्यांची थकबाकी १५ कोटी ५९ लाख १८ हजार आहे तर २ हजार ३६२ लघुदाब औद्योगिक ग्राहकांची थकबाकी ७ कोटी ९२ लाख आहे. महिन्यात एकूण १ लाख ५९ हजार ८२६ ग्राहकांची सुमारे ६४ कोटी थकबाकी आहे.

त्या-त्या महिन्यातील एकूण थकबाकी
 ऑगस्ट महिन्यातील एकूण मागणी....................८० कोटी ५८
 सप्टेंबर महिन्यातील एकूण मागणी....................८० कोटी ४३
 ऑक्‍टोबर महिन्यातील एकूण मागणी..........७२ कोटी ४७ लाख

संपादन- अर्चना बनगे

loading image