शेतकऱ्यांना दिलासा : कृषिपंप वीजजोडणीसाठी मोहीम; महावितरणचे कृषी ऊर्जा पर्व

MSEDCL will run the Krishi Urja Parva in the state from March 1 to April 14 kokan marathi news
MSEDCL will run the Krishi Urja Parva in the state from March 1 to April 14 kokan marathi news

चिपळूण : शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी, दिवसा 8 तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा दिला जात आहे. या सर्व गोष्टी राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत राज्यात कृषी ऊर्जा पर्व ही मोहीम महावितरण राबवणार आहे. या निमित्ताने "माझे वीजबिल, माझी जबाबदारी' ही मोहीमही सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्रक महावितरणकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

या मोहिमेत जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कृषी ग्राहक प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हा, तालुका स्तरावर व मोठ्या गावांमध्ये कृषी वीज ग्राहक मेळावे आयोजित केले जाणार आहेत. यात "माझे वीजबिल, माझी जबाबदारी' मोहिमेस सुरवात केली जाणार आहे. 

जागतिक महिला दिनाचे (ता. 8 मार्च) औचित्य साधून थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार, महिलांच्या नावावर वीजजोडणीस प्राधान्य, थकबाकी वसुली करणाऱ्या महिला सरपंचांचा तसेच महिला जनमित्रांचा व ऊर्जामित्रांचा सत्कार, महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. 

बिल भरण्यास प्रोत्साहित करणार 
धोरणाच्या प्रचारासाठी जिल्हा परिषदा, जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील व पंचायत समिती कार्यालये, बस स्थानके, रेल्वे स्थानके, कृषी बाजारपेठा, मार्केट यार्ड, जत्रेची ठिकाणे, आठवडा बाजारांत फलक लावण्यात येणार आहेत. दीड महिना चालणाऱ्या या मोहिमेद्वारे जनजागृती करून महावितरणतर्फे कृषी वीज ग्राहकांना वीजबिल भरण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे. 

कृषी वीज धोरणाची माहिती देणार 
थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांचा सत्कार, नवीन कृषी ग्राहकांना वीजजोडणी मंजुरीचे पत्र व अंदाजपत्रक, वीजजोडणी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. याबरोबरच ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदांच्या समन्वयाने ग्रामसभा आयोजित करून त्यात कृषी वीज धोरणाची माहिती दिली जाणार आहे.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com