खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाचे सौंदर्य पावसामुळे खुलले असले तरी येथील धोकादायक वळणावर अपघाताचा धोका कायम आहे. त्यामुळे हे ठिकाण अपघाताच्यादृष्टीने संवेदनशील बनले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणामुळे घाटातील प्रवास सुस्साट झाला असला तरी अवघड वळणावरील अपघातांची मालिका सुरूच आहे.