Kashedi Ghat gabion wall construction
esakal
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या कशेडी घाटातील भोगाव हद्दीतील गेल्या २० वर्षांपासून सातत्याने खचणाऱ्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. ठेकेदार कंपनीने १०५ मीटर लांबीच्या धोकादायक भागात गॅबियन तंत्राचा वापर करून संरक्षक भिंत उभारण्यासह रस्त्याचे मजबुतीकरण केले आहे. त्यामुळे या ‘डेंजर झोन’चा धोका कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, कामाची खरी कसोटी आगामी पावसाळ्यात लागणार (Mumbai Goa Highway Kashedi Ghat repair) आहे.