दरड कोसळून ढिगाऱ्याखाली अडकला JCB; एकजण जागीच ठार

डोंगराचा काही भाग घळण्याची भिती असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
kokan
kokanesakal
Updated on: 
Summary

डोंगराचा काही भाग घळण्याची भिती असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.

चिपळूण - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Goa Highway) परशुराम घाटात दरड कोसळून (Land Slide) ढिकाऱ्याखाली जेसीबी अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेसीबीमध्ये (JCB) दोन कामगार असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, दरड खाली कोळसताना एक कामगार पळून गेल्याने तो वाचला असून दुसरा कामगाराचा या घटनेत मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. डोंगराचा काही भाग आणखी घळण्याची भिती असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. (Konkan News)

kokan
दिल्लीत खलबतं: 'अनेक गोष्टी अडचणीत', संभाजीराजे राऊतांच्या भेटीला

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे (Parshuram Ghat) चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काम करत असताना कापलेल्या डोंगराची अचानक दरड कोसळली. त्याचा भराव थेट तेथे काम करणाऱ्या जेसीबीवर आल्याने जेसीबी ढिगाऱ्यखाली अडकला आहे. जेसीबीमध्ये दोन कामगारअडकले होते यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, डोंगरावरील भराव खाली येण्याची शक्यता असल्याने परशुराम घाटातील वाहुतक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. दोन ते अडीच तास वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याला पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते-चेरणी मार्गे लोटे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com