Mumbai-Goa Highway Traffic Chaos: मुंबई-गोवा महामार्गावर विकेंडला भीषण कोंडी; इंदापूर-माणगाव बायपास रखडल्याने प्रवाशांचे हाल

मुंबई-गोवा महामार्गावर वीकेंडला इंदापूर-माणगाव परिसरात २-३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; रखडलेली बायपास व पुलांची कामे, अरुंद रस्ता आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे प्रवाशांचे हाल
Weekend Nightmare: Commuters Struggle with Gridlock on Mumbai-Goa Highway

Weekend Nightmare: Commuters Struggle with Gridlock on Mumbai-Goa Highway

sakal

Updated on

पाली : शनिवारी आणि रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास नको रे बाबा! अशी संतप्त आणि उद्विग्न प्रतिक्रिया सध्या महामार्गावरून प्रवास करणारे पर्यटक व चाकरमान्यांकडून उमटत आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वीकेंडला या महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढते. रविवारी (ता. २४) व शनिवारी (ता. २३) देखील महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव शहरात वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बेशिस्त वाहन चालकांमुळे कोंडीत आणखीन भर पडते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com