Nitin Gadkari’s Statement vs Ground Reality
esakal
चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग महिन्याभरात (Mumbai Goa Highway NH66) पूर्ण होईल, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात सांगितले. मात्र, महामार्गाबाबत कागदावरची प्रगती आणि वास्तव यातील दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. हा महामार्ग १०० टक्के पूर्ण होण्यासाठी अजून चार महिने लागतील, असा अंदाज आहे. पावसाळ्यात संथगतीने काम सुरू राहिल्यास त्यानंतरच हा मार्ग पूर्ण होऊ शकेल.