Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Mumbai-Goa Highway waterlogging issue : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वरच्या उक्षी फाटा परिसरात पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. निचऱ्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.
Why is Mumbai-Goa Highway flooded?

Why is Mumbai-Goa Highway flooded?

esakal

Updated on

संगमेश्वर : कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची मालिका या पावसाळ्यातही कायम आहे. पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये महामार्गावरील उक्षी फाटा परिसरात पाणी साचले (Ukshi Phata highway flooding news) असून, संपूर्ण परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com