Pugaon Maharashtra hazardous chemical leakage news
esakal
पाली : ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुगाव गावाच्या हद्दीत मंगळवारी (ता. 15) पहाटे पाचच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि गंभीर घटना घडली. जेएनपीटी येथून महाडच्या दिशेने चाललेल्या एका कंटेनरला अचानक अपघात (Mumbai-Goa National Highway Container Accident) झाला. या कंटेनरमध्ये '2-Methyl-2-propanol' (tert-Butanol) हे अतिशय धोकादायक आणि अत्यंत ज्वलनशील रसायन वाहून नेले जात होते.