Raigad News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या खड्ड्यात दोन बस अडकल्या; 'दोन्ही बाजूची वाहतूक बंद'..
Mumbai-Goa National Highway : सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेचे (SVRSS) सदस्य घटनास्थळी उपस्थित असून दोन्ही बस बाजूला काढण्यासाठी सहकार्य केले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Two buses stuck in a huge pothole on the Mumbai-Goa Highway; traffic suspended on both sides as rescue efforts begin.Sakal
पाली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खांब गावाजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. सोमवारी (ता. 26) मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास या मोठ्या खड्ड्यात दोन बस अडकल्याने येथील वाहतूक बंद झाली होती.