esakal | कोकणात धावणाऱ्या 6 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; दोन गाड्या रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

कोकणात धावणाऱ्या 6 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी : मुसळधार पावसाचा तडाखा कोकणाबरोबरच मुंबईला (Mumbai) बसला आहे. त्याचा परिणाम कोकण (Kokan) रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला आहे. दोन गाड्या रद्द केल्या असुन सहा गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. मुंबईत पाणी साचल्यामुळे रेल्वे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.मुंबईला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला आहे.(mumbai-konkan-railway-six-train-time-table-changed-two-trains-canceled-akb84)

मुंबईमधून कोकणात येणार्‍या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून काही गाड्या उशिराने धावत आहेत. कोकणातही मुसळधार पाऊस सुरुच आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यात सीएसटीएम-मडगाव स्पेशल आणि मडगाव-सीएसटीएम यांचा समावेश आहे. तसेच सहा गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यात मंगलुर-मुंबई सीएसटीएम अडीच तास उशिराने सोडण्यात आली.

हेही वाचा: Corona Updates: दिलासादायक! कोरोनाचा प्रभाव ओसरतोय; रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली

एर्नाकुलम-अजमेर विकली स्पेशल १८ जुलैला सायंकाळी साडेसहा वाजता सुटणारी गाडी आठ तास उशिराने सुटणार आहे. १९ ला पहाटे ५.१५ वाजता सुटणारी तिरुनवेल्ली-जामनगर विकली स्पेशल गाडी दुपारी 2 वाजता तिरुनवेल्लीहून सुटणार आहे. नेत्रावती एक्स्प्रेस रविवारी सायंकाळी उशिरा सोडण्यात आली आहे. लोकमान्य टिळक-मंगळूर एक्स्प्रेस गाडी १९ ला रात्री १२.४५ वाजता सुटली असून मुंबई सीएसटीएम-मंगळूर ही गाडी तिन तास उशिराने सोडण्यात आली आहे.

loading image