esakal | Corona Updates: दिलासादायक! कोरोनाचा प्रभाव ओसरतोय; रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली असतानाही भारतात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत.

Corona Updates: दिलासादायक! कोरोनाचा प्रभाव ओसरतोय; रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली असतानाही भारतात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 38 हजार 310 रुग्ण आढळले असून 490 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या प्रतिदिन 40 हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 82 लाख 67 हजार 623 वर पोहचली असून 1 लाख 23 हजार 97 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 76 लाख 3 हजार 121 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी एका दिवसात कोरोनाचे 58 हजार 323 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आाल आहे.

सोमवारी एका दिवसात 10 लाख 46 हजार 247 चाचण्या झाल्या आहेत. तर रविवारच्या चाचण्या धरून आतापर्यंत देशात 11 कोटी 17 लाख 89 हजार 350 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

Bihar Election Live Updates- बिहारच्या जनतेला बदल हवा आहे- राबडीदेवी

सध्या युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. युरोपातील अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सध्या जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन जाहीर केले आहे. 2020 च्या सुरुवातीला ज्यावेळेस कोरोनाची पहिली लाट आली होती त्यावेळेस युरोपातील फ्रान्स, स्पेन, ब्रिटन आणि जर्मनी या देशांना मोठा फटका बसला होता. 

चीनमधून सुरु झालेली कोरोनाची साथ आज जगभर पसरली आहे. अमेरिकेलाही याचा मोठा फटका बसला आहे. जगाचे अर्थचक्र थांबले असून मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती घसरल्या आहेत.

(edited by- pramod sarawale)

loading image