गुड न्यूज : ऑफलाईन प्रवेशप्रक्रियेस रत्नागिरी, सिंधुदुर्गला परवानगी..

Mumbai University Admission Process Schedule Announced  Offline admission process allowed to Ratnagiri Sindhudurg
Mumbai University Admission Process Schedule Announced Offline admission process allowed to Ratnagiri Sindhudurg

सिंधुदुर्ग : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थांना प्रथम विद्यापीठाकडे नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

२२ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थांना विद्यापीठाकडे ऑनलाईन नोंदणी करता येईल. ४ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यादीनंतर विद्यार्थांचे प्रवेश निश्‍चित करण्यासाठी शहरी भागातील महाविद्यालयांना ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयांना प्रवेशासाठी ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देता येणार आहेत.

महाविद्यालयामध्ये ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. या प्रकियेनुसार विद्यार्थ्यांनी हमीपत्र अर्ज भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्‍चित करून कागदपत्रांच्या मूळ प्रती विद्यार्थ्यांनी सादर केल्यावर अंतिम प्रवेश द्यायचा आहे. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती टाळण्यासाठी महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करावा, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.

विद्यापीठ प्रशासनाने केले आवाहन

शहरी भागातील महाविद्यालयांनी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयांना प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्यास व प्रतिबंधित क्षेत्रात मोडत नसल्यास सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून ऑफलाईन प्रक्रिया राबवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, एखाद्या विद्यार्थ्यास प्रवेशासाठीच्या तांत्रिक सुविधेसाठी अडचणी आल्यास त्याने जवळील महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक 
- अर्ज विक्री - २४ जुलै ते ४ ऑगस्ट
- प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया - २२ जुलै ते ४ ऑगस्ट (१ वाजेपर्यंत) 
- ॲडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख - २७ जुलै ते ०४ ऑगस्ट, (३ वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्‍यक) 
- पहिली मेरिट लिस्ट - ४ ऑगस्ट ( सायंकाळी ७ वाजता) 
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) - ५ ऑगस्ट ते १० ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत) 
- दुसरी मेरिट लिस्ट - १० ऑगस्ट ( सायं. ७ वा.) 
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) - ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट ( दु. ३ वाजेपर्यंत) 
- तिसरी मेरिट लिस्ट - १७ ऑगस्ट ( सायं. ७ वा.) 
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) - १८ ते २१ ऑगस्ट

अडचणी आल्यास येथे संपर्क करा
मुंबई विद्यापीठाने १८ जुलैपासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नोंदणी करताना काही अडचणी आल्यास विद्यार्थांना ०२०-६६८३४८२१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा 
विद्यापीठाने या वर्षी विद्यार्थ्यांना आवश्‍यक शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( click on-Mumbai University Pre Admission online Registration २०२०-२१) या लिंकवर क्‍लिक करावे.


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com