

Heavy Rain Brings Mumbai–Goa Highway to a Halt; Kashedi and Tamhini Ghats Shut
esakal
-महेंद्र दुस्सार
अलिबाग : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसला असून कशेडी घाटातील नव्या महामार्गावर मोठी दरड कोसळल्याने वाहतूक दुसऱ्या दिवशीही ठप्प राहिली. दरडीसह मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.