भविष्यात सिंधुदुर्गनगरीची नगरपंचायत अस्तित्वात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

रानबांबुळी गाव हे जिल्हा मुख्यालयमधील भाग असून सिंधुदुर्गनगरीच्या विकासासाठी यापूर्वी 25 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरीच्या विकासासाठी यापूर्वीच 25 कोटी निधीची तरतुद करण्यात आली आहे. या निधीतून विकास कामांना सुरूवात झाली आहे . आता महाविकास आघाडीच्या बदलत्या कोकण विकासात झपाट्याने बदल होतील . लवकरच सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत अस्तित्वात येईल . या गावाचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली. 

हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

 रवळनाथ मंदीर पटांगणावर रानबांबुळी ग्रामोन्नती मंडळ आणि ग्रामपंचायत रानबांबुळी यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाचे बक्षीस वितरण आमदार नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर , सरपंच वसंत बांबुळकर , उपसरपंच सतिश परब , ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष गोविंद नाईक , परशुराम परब , सुनिल परब आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

रानबांबुळी गावातील 150 जेष्ठ नागरीकांचा सत्कार

हिरक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त रांगोळी स्पर्धा, प्रश्‍नमंजूषा स्पर्धा, कबड्‌डी, कविता पाठांतर सारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच रानबांबुळी गावातील 150 जेष्ठ नागरीक (पुरुष/महिला) यांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी आमदार नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये विजयी स्पर्धकांना विविध बक्षिसे देवून गौरविण्यात आले. 
 
 25 कोटीचा निधी मंजूर

नाईक म्हणाले, 'रानबांबुळी गाव हे जिल्हा मुख्यालयमधील भाग असून सिंधुदुर्गनगरीच्या विकासासाठी यापूर्वी 25 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या निधीतून विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे. सिंधुदुर्गनगरीची नगरपंचायत लवकरच अस्तित्वात येईल. त्यानंतर सिंधुदुर्गनगरीचा कायापालट होईल. या गावच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहे.' 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Municipality Of Sindhudurganagar Will Exist